We will fetch book names as per the search key...
| Seller | Price | |
|---|---|---|
| StoryMirror Best price | ₹150 | |
| Amazon | Price not available | |
| Flipkart | Price not available |
About the author
"लेखकाला लहानपणापासून लिखाणाची आवड आहे. त्यांनी बँकिंग आणि विमा क्षेत्रात
पदवीचे शिक्षण घेतले आहे.
अनेक स्पर्धामध्ये त्यांनी विजेतेपद मिळवले आहे. २०२१ मध्ये
स्टोरीमिरर च्या लेखन स्पर्धांमध्ये नामांकन मिळवले आहे.अनेक ऑनलाईन पोर्टल वर ते
लेखन करतात. लेखकाला लिखाणाबरोबर फिरण्याची सुद्धा आवड आहे. त्यांनी भारतभर भ्रमण केले आहे, हैद्राबाद,गोवा, कर्नाटक अश्या भरपूर राज्यात त्यांनी आपला प्रवास केला आहे.
आपले उत्कृष्ट लेखन लोकांपर्यन्त पोहचवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. कथांमधून समाज प्रबोधन घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. लेखकाने वेळात वेळ काढून हे पुस्तक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. लेखक अगदी शाळेत असताना सुद्धा लेखकाला निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा मध्ये भरघोस बक्षिसे मिळाली आहेत.
असच काहीस मनात आलेल्या कवितेच्या ओळी... खूप वेळा शब्द मिळत नाही, काही वेळा शब्दांना आधार मिळावा म्हणून भावनांचा मेळ तूच सांग रोजनिशी, अश्या स्थिती मध्ये कसा लिहू माझ्या मनातल्या गोष्टी.
डोळ्यांवरती झोप, पण जागणं आवश्यक आहे. स्पर्धामध्ये जरी हरलो, तरी सतत लिखाणकाम करणार आहे..."
About the book
"लग्नप्रवास हे पुस्तक मुलीच्या आयुष्यातील माहेर आणि सासर असा रहस्यमय प्रवास
आहे. लग्नानंतर मुली कोण कोणत्या प्रवासाला सामोरे जातात हा थक्क आणि अतिशय
रोमांचक प्रवास ह्या पुस्तकांतून आपल्याला वाचायला मिळणार आहे.
लग्नानंतर पती हाच आपला परमेश्वर मानून चालणारी स्त्री, सासर हेच माहेर. स्त्री च्या आयुष्यात येणार असे नाना प्रकारचे प्रवास हे माझ्या लग्नप्रवास ह्या पुस्तकात तुम्हाला अनुभवयला मिळतील."